पुण्यात भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार ; अजित पवार संतापले

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुण्यात भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार ; अजित पवार संतापले

पुण्यातील सदाशिव पेठेत एका विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भर रस्त्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात हल्ला करणाऱ्या आरोपीला उपस्थितांपैकी दोन तरुणांनी हिम्मतीने पकडून तरुणीचा जीव वाचवला. एमपीएसी परिक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार या तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केल्याचं प्रकरण ताज असताना आता भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसंच गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा, असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला आहे.

या घटनेबाबत ट्विट करताना अजित पवार म्हणाले की, विद्देचे माहेर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारी प्रचंड फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसत आहे. दिवसाढवळ्या विद्यार्थीनींवर कोयत्याने हल्ले होत असताना गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पू्र्वपार ख्याती असलेले पूणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दान निषेद व्यक्त करतो, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.

शंतनु जाधव हा पिडीत तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो तिचा पाठलाग करुन त्रास देखील देत होता. त्याने तरुणीला सदाशिव पेठेतील पावन मारुती मंदीराजवळ गाठून तिच्याची बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तरुणीवर कोयत्याने वार केले. यावेळी अभ्यासिकेत जात असलेल्या एका तरुणाने शंतनु जाधवचा प्रतिकार केला. यानंतर घाबरून जात आरोपीने तेथून पळ काढला. यावेळी नागरिकांनी त्याचा पाठलाग करत अप्पा बळवंत चौकात त्याला पकडून चांगला चोप दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in