रावेर, जळगाव मतदारसंघात विरोधी पक्षास उमेदवार मिळेना…! भाजप उमेदवारांचा प्रचारही सुरू

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर यावेळी रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे वाट्याला आली असून जळगाव मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे.
रावेर, जळगाव मतदारसंघात विरोधी पक्षास उमेदवार मिळेना…! भाजप उमेदवारांचा प्रचारही 
सुरू

विजय पाठक

जळगाव : रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षास उमेदवार मिळत नसून उमेदवार मिळवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धावाधाव करावी लागत आहे. अजूनही उमेदवार ठरविण्यात या पक्षांना यश आलेले नाही. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडली असून भाजप उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला आहे.

जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असून या बालेकिल्ल्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ जिंकण्यात आजपर्यंत विरोधी पक्षांना यश आलेले नाही. रावेरमध्ये काँग्रेसला या मतदारसंघात जबर पराभवाला सतत सामोरे जावे लागले आहे, तर जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर यावेळी रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे वाट्याला आली असून जळगाव मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे.

रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्याविरोधात प्रथम एकनाथ खडसे निवडणूक लढवतील, असे शरद पवार गटाने जाहीर केले. खडसेंनी प्रकृती कारणास्तव नकार दिल्यानंतर रोहिणी खडसे यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांच्याही नकारानंतर अन्य उमेदवाराचा शोध सुरू आहे. रविवारी रोहिणी खडसे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन रावेर मतदारसंघासाठी लवकर उमेदवार देण्याची विनंती केली. यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला.२००९ मध्ये पाटील यांनी निवडणूक लढविली होती तेव्हा २७ हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाटील यांना संधी देण्याचा आग्रह धरला असून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. शरद पवार यांनी मात्र होकार दिला नसून सांगतो म्हणत उमेदवारीचा निर्णय अधांतरी ठेवला आहे.

ठाकरे गट सक्षम उमेदवाराच्या शोधात

जळगाव लोकसभा मतदारसंघ हा मविआ आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या स्मिता वाघ यांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार शेाधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगाव शहरातील उद्धव सेनेतील अनेक पदाधिकारी निवडणूक लढवण्यास उत्सुक असले तरी भाजपला टक्कर देऊ शकेल असा सक्षम उमेदवार ठाकरे गटाला सापडलेला नाही.

ललिता पाटील उत्सुक, पण...

प्रथम काँग्रेसमध्ये नंतर भाजप आणि आता ठाकरे गटात दाखल झालेल्या ललिता पाटील या उत्सुक असल्या तरी आणखी कुणी बडा मासा गळाला लागतोय का, याचा शेाध सुरू आहे. आज तरी दोन्ही मतदारसंघांत हा विरोधी पक्षांचा उमेदवारांचा शोध नेते कधी संपवणार याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in