सांगलीमध्ये दोन सख्ख्या भावांची आपल्या कुटुंबियांसोबत ९ जणांची आत्महत्या

विषारी औषध प्राशन केल्याने या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मागचे कारण अद्याप उलघडू शकले नाही
सांगलीमध्ये दोन सख्ख्या भावांची आपल्या कुटुंबियांसोबत ९ जणांची आत्महत्या

सांगलीमधील मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील एकाच कुटुंबातील ९ जणांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीमधून असे निदर्शनास येते की, विषारी औषध प्राशन केल्याने या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मागचे कारण अद्याप उलघडू शकले नाही. सोमवारी सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे हे दोघे एकाच ठिकाणी राहत होते, एका ठिकाणी आणि एकाच वेळी आत्महत्या करण्याइतकं काय घडलं असावं ? असा प्रश्न संपूर्ण सांगलीकरांच्या मनात उभा राहिला आहे. मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. मृतांमध्ये माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा),पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in