साताऱ्यात कोणाकोणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ; शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील की अन्य कोण…?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला महायुतीने भुईसपाट केला आहे. जिल्ह्यातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर आपला विजयी झेंडा फडकवला आणि महाविकास आघाडीला व्हाईटवॉश दिला.
शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील (डावीकडून)

Published on

रामभाऊ जगताप/ कराड

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला महायुतीने भुईसपाट केला आहे. जिल्ह्यातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर आपला विजयी झेंडा फडकवला आणि महाविकास आघाडीला व्हाईटवॉश दिला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले आहेत. मात्र निवडणूक निकाल लागून तब्बल बारा दिवसांनंतर मंत्रिमंडळ स्थापनेचा मुहूर्त उजाडला असून आज होणाऱ्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोणकोणत्या मातब्बर नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची 'माळ' पडणार व त्यांना कोणते (क्रीम) खाते मिळणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील आ. शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे यांच्या नावाची सध्या तर नुसती चर्चा आहे. त्यातही कोणाला कोणती खाती मिळणार ? व कोणाची पालक मंत्रीपदासाठी वर्णी लागणार हेही प्रश्न लोक एकमेकांना विचारू लागले आहेत.

राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर यावेळी काही नेत्यांना देखील मंत्रिपदाची शपथ दिली जाणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे. त्यातच सातारा जिल्ह्याला फिक्स मंत्रिपद मिळणारच असे महायुतीच्या नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले असले यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलेले आमदार शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती, तर त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे शंभूराज देसाई यांना यंदाही मंत्रिपद 'फिक्स' असेल असे येथे मानले जात आहे. शंभूराज देसाई यांच्यानंतर साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. सलग ५ टर्म साताऱ्याचे आमदार राहीलेल्या शिवेंद्रराजेंना यंदा तरी मंत्रिपद मिळावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवेंद्रराजेंना मंत्रिपद द्या, मी जिल्ह्यात भाजप वाढवतो, असा शब्द उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याच्या चर्चा आहेत.

मंत्रिपदाबाबत तिसरे नाव म्हणजे वाईचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांचे नाव खुद्द अजित पवार यांनीच घेत पाटलांच्या मंत्रिपदाबाबत थेट संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या अजित पवारांना विचारण्यात आले असता त्यांनी 'सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे,’ अशा शब्दांत साताऱ्याला मंत्रिपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला आहे.

साताऱ्यात अजित पवार गटाचे २ आमदार आहेत. एक म्हणजे मकरंद पाटील आणि दुसरे म्हणजे फलटणचे सचिन कांबळे मात्र कांबळे यांनी ही पहिलीच आमदारकीची संधी असल्याने त्यांचे नाव मागे पडू शकते.त्यानंतर कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉ. अतुल भोसले, माण-खटावच्या भाजप आमदार जयकुमार गोरे व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वळतुळातून केली जात आहे.

मात्र, सातारा जिल्ह्याला २ किंवा ३ च मंत्रीपदे मिळणार असल्याने कोणाला मंत्रिपद द्यायचे याचा पेच महायुतीसमोर निर्माण झाला नाही तरच नवल. आता सातारा जिल्ह्यातील आठ आमदारांपैकी कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल? हे आजच्या शपथविधीनंतरच स्पष्ट स्पष्ट होणार आहे.

असा रंगणार शपथविधी

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

आझाद मैदानात ३० हजारपेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात आला आहे.

आझाद मैदानावर १०० बाय १०० चे मुख्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज उभारधण्यात आली आहेत. हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे आहे.

या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून होणाऱ्या या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील तर याचवेळी दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होईल. त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडेल, अशी शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in