Raigad Lok Sabha Elections: सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या 'डुप्लीकेट' नावामुळे मतविभाजनाचा धोका

ठाकरे गटाचे उमेदवार अनंद गीते आणि अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे या दोघांमध्ये चुरशी लढत होणार असून या दोन्ही नेते रायगडमध्ये जोरदार प्रचार करत आहे. रायगड मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे.
Raigad Lok Sabha Elections: सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या 'डुप्लीकेट' नावामुळे मतविभाजनाचा धोका
Published on

मुंबई : सध्या राज्यात रायगड मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अनंत गीते या दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत होणार आहे. या दिग्गज नेत्यांच्या लढतीमुळे मतदासंघ चर्चेचा विषय नाही. तर या मदारसंघात दोन्ही उमेदवारांच्या नावाशी मिळतीजुळती नावे असलेले तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मिळत्या जुळत्या नावांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यात नाकारता येत नाही.

रायगडमध्ये अनंत गीते यांच्यासारख्या नावाचे दोन उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यात अनंत गीते आणि अनंत बाळोजी गीते या दोन उमेदवारांनी अपक्ष उमेवारी अर्ज भरला आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते आहेत. यामुळे आता अनंत गीते नावाच्या तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या नावाच्या एका व्यक्तीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या उमेदवारांचे नाव सुनील दत्ताराम तटकरी असे आहे. तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. परंतु, आज (२२ एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे मिळत्या जुळत्या नावांमधील कोणता उमेदवार आपला अर्ज मागे घेणार, हे पाहावे लागेल. जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर, सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोन्ही उमेदवारांना मत विभागाचा धोका आहे.

गीते आणि तटकरे यांचा दिग्गज नेते प्रचार करणार

ठाकरे गटाचे उमेदवार अनंद गीते आणि अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे या दोघांमध्ये चुरशी लढत होणार असून या दोन्ही नेते रायगडमध्ये जोरदार प्रचार करत आहे. रायगड मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनंद गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार देखील रॅली घेणार आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते मंडळी देखील सुनील तटकरे यांच्यासाठी रॅली घेणार आहेत.

२०१४ मध्ये मिळती-जुळती नावे

यापूर्वी २०१४ लोकसभा निवडणुकीत मिळती-जुळती नावाच्या उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे याच्या नावाच्या व्यक्तीला ९ हजार मते मिळाली होती. ही मते ही सुनील तटकरे यांच्या नावाची होती. यापूर्वी १९९१ मध्ये शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावासारख्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे शेकापच्या दत्ता पाटील यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटीची तारीख आहे. यामुळे रायगड मधील मिळती जुळती नावे असलेले अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार की, निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in