कराड : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांगांत विस्तीर्ण पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या १७ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचा फोटो जंगलातील ट्रॅप कॅमेरामध्ये कैदझाला आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र हा समृद्ध नैसर्गिक जैवविविधतेचा असल्यासह भविष्यात या प्रकल्पात पट्टेरी वाघांच्या विपुलतेने समृद्ध झाला नाही, तरच नवल; मात्र यासाठी वन, वन्य जीव विभागासह शासकीय पातळीवरून ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव ज्या ठिकाणच्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघचा फोटो कैद झाला आहे ते ठिकाण गोपनीय ठेवण्यात आले असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत रांगांत विस्तीर्ण पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल भागात वन विभागाने ठिक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले असून, या कॅमेऱ्यामध्ये कैद होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवले जाते. वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात गेल्या १२ डिसेंबर रोजी वाघाच्या पायाचे ठसे मिळाले होते. सदर बाब गस्तीवर असलेल्या वनरक्षक व वनमजूर यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी तातडीने ही बाब वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली असता, त्यांच्या सूचनेनुसार पुढील आणखी काही दिवस वाघाच्या पायांच्या पंजांचे ठसे व विष्ठा यावरती ठेवण्यात आले असता पुढे त्या तीन दिवसांतही वेगवेगळ्या ठिकाणीपायांचे ठसे व विष्टा सापडली.
दरम्यान, पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्याने वन विभागाने जंगल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी।लावलेले टॅप कॅमेरे तपासले असता गेल्या रवि.१७ डिसेंबर रोजी पहाटे ४.५९ वा. पट्टेरी वाघाचा फोटो कैद झाला असल्याचे निदर्शनास आले.वाघाच्या दर्शनाने या प्रकल्पासाठी ही बाब अत्यंत आशादायी असल्याने राज्यातील सह्याद्रीसह सर्व व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अस्तित्वात वाढ होण्यासाठी वन विभागाने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.