Maratha Reservation:आरक्षणाच्या दुसऱ्या टप्य्यात जरांगे यांची प्रकृती खालावली "मला बोलता येतंय तो पर्यंत चर्चेला या" सरकारला केलं आवाहन....

मराठा बांधवानी एकजूट व्हा, फुटू देऊ नये महारष्ट्रात जिथं जिथं साखळी उपोषण आहे तिथं तिथं आमरण उपोषणाला सुरुवात करावी.
Maratha Reservation:आरक्षणाच्या दुसऱ्या टप्य्यात जरांगे यांची प्रकृती खालावली "मला बोलता येतंय तो पर्यंत चर्चेला या" सरकारला केलं आवाहन....

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पुन्हा पेटला आहे. जालनेतील अंतरवली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरु आहे. जरांगे यांनी सरकाराला ४० दिवस दिले होते. पण सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे राज्यात परत एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला.

आज अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आज त्याची प्रकृती खालावली आहे. तरीही त्यांनी उपचारांसाठी नकार दिला आहे. त्यांनी पहिल्या दिवसापासून कोणत्याही औषध उपचारासाठी नकार दिला आहे. मला बोलता येतंय तो पर्यंत चर्चेला या असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून ५० टक्कयांच्या आत आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषण सुरु केलं होते. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून आज त्याची प्रकृती अधिक खालावली आहे. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांना नीट बोलता येतं नाहीं आहे. आरोग्य विभागाचं पथक इथं दाखल झालं असून त्यांनी उपचारासाठी नकार दिला आहे.

जरांगे यांनी आज काही प्रत्रकारांशी संवाद साधला मराठा बांधवानी एकजूट व्हा, फुटू देऊ नये महारष्ट्रात जिथं जिथं साखळी उपोषण आहे तिथं तिथं आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज दया जेणेकरून सरकारला समजले राज्यात किती ठिकाणी उपोषण सूरु आहेत. आत्महत्या करू नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. सरकारने अजूनही काही संवाद साधला नाहीं आहे. माझ्या प्रश्नाची उत्तर दिली नाही आहेत. मला आता बोलता येतं नाही आहे. मला बोलायला त्रास होत आहे,असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in