समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावच्या शेतकऱ्यांचे आभार मानले.
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (26 मे) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्दी महामार्गच्या शिर्डी ते भरवीर या 80 किमीच्या टप्प्याचे उद्धघाटन करण्यात आले. शिर्डीजवळील कोकमठाण येथे या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावच्या शेतकऱ्यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्याचा विकास करायचा असले तर मागास भाग मुंबई आणि बंदरांना जोडणे गरजेचे होते. समृद्धी महामार्ग अनेकांना केवळ स्वप्न वाटायचा. पण मला आणि एकनाथ शिंदेना या महामार्गाचे काम निर्धारीत वेळेत पु्र्ण होईल असा विश्वास होता. आज ते होताना दिसून येत आहे. 'अंदाज कुछ अलग है, मेरे सोचनेका, सबको मंजिलो का शौक है, और मुझे रास्ते बनाने का,'" असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, "या महामार्गासाठी जागा हस्तांतरिक करण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत कायदा केला. आणि जागेला न भुतो असा दर दिला. अनेकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला सभा घेऊन महामार्ग होऊ देणार नसल्याचे सांगितले. तर शरद पवारांनी नगर जिल्ह्यात बैठक घेऊन हे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, ज्या गावात विरोध केला, तिथल्या शेकऱ्यांनीच स्व:ताहून जमिनी देण्यास तयार असल्याचे पत्र दिले", असे फडणवीस म्हणाले.

या महामार्गामुळे होणाऱ्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले की, "समृद्धी महामार्ग राज्यातील 15 जिल्ह्यांचे भविष्य बदलणार आहे. आधी मुंबई आणि पुण्याचा विकास व्हायचा, तो आता गोंदीया पर्यंत होणार आहे. या महामार्गामुळे उद्योगधंदे, कृषी समृद्धी या सर्व गोष्टी करु शकणार आहोत", असे त्यांनी सांगितले.

या महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांनी लवकरच समृद्धी महामार्गावर 'इटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम' लवकर बसवण्यात यावी, अशी विनंती केली. या महामार्गवर 120 किमीची वेगमर्यादा असून सर्व गाड्या त्या वेगाने चालू शकत नाही. त्यामुळे अशा गाड्या या महामार्गावर नेल्या तर अपघात होऊ शकतो. महामार्ग वेगवान असला तरी आपल जीवन त्यापेक्षा मुल्यवान आहे. म्हणून लोकांनी काळजी घेण आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in