एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ चे उद्घाटन; ब्रह्मांडाचे निरिक्षण व अध्ययन होणार

या शाळेचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबरच अन्य नागरिकांना होईल. ज्योर्तिविद्या परिसंस्था देशातील सर्वात जुनी संस्था असून याचा उपयोग पंचांग निर्मितीसाठी केला जातो.
एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ चे उद्घाटन; ब्रह्मांडाचे निरिक्षण व अध्ययन होणार

प्रतिनिधी/पुणे : ब्रह्मांडाचे निरिक्षण व अध्ययनासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सच्या वतिने ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ची निर्मिती एमआयटीच्या इकोपार्क टेकडीवर करण्यात आले. येथे एकूण तीन दुर्बीणी बसविण्यात आल्या आहेत. त्यात जीएसओच्या दोन दुर्बीण एक ८ इंच न्यूटोनियन आणि १० इंची रिचिक्रीशन या दोन्ही दुर्बीणी तायवान वरून आयात तसेच युनीस्टेलर इव्हीस्कोप टू ही दुर्बीण फ्रान्स या देशातून आयात करण्यात आली आहे.

इस्त्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आलोक श्रीवास्तव आणि ज्योर्तिविद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष अनिरूध्द देशपांडे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते सोमवारी ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आलोक श्रीवास्तव म्हणाले, ‘‘भविष्यात एमआयटी डब्ल्यूपीयू इस्त्रो सारखे उपग्रहावरील अवकाश वेधशाळा बनवू शकेल अशी आशा आहे. येथे चंद्र, तारे यांच्याबरोबरच ब्रह्मांडाचे दर्शन घडून ते विश्व समोर आणण्याचा प्रयत्न करतील.’’ अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘‘ही वेधशाळा पुण्यातील मध्यवस्तीत असल्याने जमीनवरील निरिक्षणासाठी अत्यंत महत्वाची आहे. या शाळेचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबरच अन्य नागरिकांना होईल. ज्योर्तिविद्या परिसंस्था देशातील सर्वात जुनी संस्था असून याचा उपयोग पंचांग निर्मितीसाठी केला जातो.”

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले," आज आम्ही ब्रह्मांडचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतू संतांनी निसर्ग आणि जीवनासंदर्भात माहिती दिली.तसेच आत्म ज्ञानाचा परिचय करून दिला आहे. त्यातूनच आत्म साक्षात्कार आणि ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त होते.” प्रा.डॉ. मिलिंद पांडे म्हणाले," हा प्रकल्प अत्यंत अद्वितीय असून भविष्यात रॉयल सोसायटी फॉर लंडन अ‍ॅस्ट्रॉनॉमी कडून एमआयटीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फेलोशीप बरोबरच एक तरी नोबेल पुरस्काराचा विजेता बनेल यात शंका नाही. येथे अध्यात्मा बरोबरच विज्ञानाचा मेळ दिसून येतो.”

आकाशगंगा, धूमकेतूचे छायाचित्र घेता येणार

या संदर्भात कॉसमॉस ॲस्ट्रोनॉमी क्लबच्या समन्वयक प्रा.अनघा कर्णे यांनी सांगितले की, या वेधशाळेत बसविण्यात आलेले दो टेलीस्कोप हे संशोधनासाठी आणि एक दुर्बीण ही आकाश दर्शनासाठी बसविण्यात आली आहे. या वेधशाळेतून डीप स्काय इमेज घेता येईल. यामध्ये चंद्र, नेबूला, ग्रह, तारे, आकाशगंगा, ५० हजार वर्षातून एकदा दिसणाऱ्या धूमकेतूचे फोटो काढण्यात आले. त्याच प्रमाणे पिनव्हिल गॅलेक्सीमधील एसएन२०२३ आयएक्सएफ सूपर नोव्हा याचे निरिक्षण करण्यात आले. तसेच येथे विविध ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in