
पुणे, पिंपरी-चिंचवड व औंध येथील बिल्डरवर प्राप्तिकर विभागाने छापे मारले आहेत. कर चुकवेगिरी व बेहिशोबी संपत्तीप्रकरणी ही कारवाई केली आहे. मालमत्ता क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढू लागल्याने प्राप्तिकर विभागाने बांधकाम क्षेत्रातील बिल्डर्सशी चौकशी सुरू केली. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी आणि कर नियमांचे पालन करण्याबाबत ही छापेमारी प्राप्तिकर विभागाने केली आहे.
पुण्यातील औंध, पिंपरी-चिंचवड येथील बिल्डर्सकडून गैरव्यवहार होत असल्याचा संशय आल्याने प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली. औंध येथील सिंध सोसायटीसह तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली.