संभाजीनगरात बिल्डरांवर आयकरचे छापे ;एकाच वेळी ११ ठिकाणी धाडी

पुणे येथील आयकर विभागाने छापेमारी करत प्रतिष्ठित व्यावसायिकांवर कारवाई केली. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
संभाजीनगरात बिल्डरांवर आयकरचे छापे ;एकाच वेळी ११ ठिकाणी धाडी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बड्या बिल्डर लॉबीवर एकाच वेळी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. गुरुवारी पहाटे आयकरचे बडे अधिकारी, कर्मचारी असा तब्बल २०० हून अधिक जणांचा ताफा ११ बड्या बिल्डरांच्या बंगले अन‌् कार्यालयांवर धडकला. या कारवाईने शहरातील बांधकाम क्षेत्र हादरले आहे. शिरीष गादीया, अनिल मुनोत यांच्यासह लाभशेटवार आदी बड्या बिल्डरांवर छापे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईबाबत आयकर विभागाने मोठी गुप्तता पाळली असून किमान तीन दिवस ही कारवाई चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे येथील आयकर विभागाने छापेमारी करत प्रतिष्ठित व्यावसायिकांवर कारवाई केली. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. माहितीनुसार, विभागाचे वरिष्ठ बुधवारी सायंकाळीच दाखल झाले होते. खबरबात लागू नये म्हणून सरकारी वाहनांऐवजी त्यांचा ताफा खासगी वाहनांमधून शहरात दाखल झाला. सकाळी ६ वाजेपासूनच कारवाईला सुरुवात झाली.

logo
marathi.freepressjournal.in