कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ ; कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

केंद्राने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करुन ४० टक्के केलं आहे. ३१ डिसेंबर पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे
कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ ; कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. केंद्रायने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याचा शक्यता आहे. आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता. अशात निर्यात शुल्क (Export Duty On Onion) वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून यामुळे नाशिक आणि अहमदनगरचे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

केंद्राने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करुन ४० टक्के केलं आहे. ३१ डिसेंबर पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.यामुळे कांद्याचे भाव खाली येण्यास मदत होणार आहे. तर याचा थेट तोटा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या कांद्याचे दर हे ३० ते ४० रुपयांच्या घरात असून किंमती पाडण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वी बफर स्टॉक बाजारात आणला होता.

काही दिवसांआधीच कांद्याचे दर वाढले असताना अचानाक निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याविरोधात शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. तर नाशिकच्या लासलगाव, पिंपळगांव, सटाणा बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत केंद्राच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in