
मुंबई : राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४.३९ टक्के वाढ राज्य सरकारने सोमवारी जाहीर केली आहे. तर मुंबईतील रेडी रेकनरच्या दरात ३.३९ टक्के वाढ केली. या वाढीव दरांमुळे घर खरेदी महाग होणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे हे नवीन दर उद्यापासून अंमलात येणार आहेत.
राज्यातील सर्व मनपा क्षेत्रात रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.९५ टक्के वाढ झाली. उल्हासनगरमध्ये ७.७२ टक्के, ठाणे व मीरा भाईंदरमध्ये ६.२६ टक्के तर नाशिकमध्ये ७.३२ टक्के दर असेल. तर नवी मुंबईत रेडी रेकनरच्या दरात ६.७५ टक्के वाढ झाली. सोलापुरात १०.१७ टक्के तर अमरावतीत ८.३ टक्के वाढ झाली. २०२२-२३ नंतर राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे.