मार्वल रिअलटर्सची बाजाराच्या तुलनेत पुनर्विक्री मूल्यात वाढ

पुण्यातील मार्वलच्या लक्झरी प्रॉपर्टीचे वर्षानुवर्षे होणारे मूल्य मापन एकूण प्रमाणाच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
मार्वल रिअलटर्सची बाजाराच्या तुलनेत पुनर्विक्री मूल्यात वाढ

पुण्यातील प्रख्यात लक्झरी रिअल इस्टेट डेव्हलपर, मार्वल रिअलटर्स ने बाजाराच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तांच्या पुनर्विक्री मूल्यात सातत्याने वाढ नोंदवली आहे. मार्व्हल आर्को, हडपसर यांनी पुनर्विक्री मूल्यात १०७ टक्के, मार्वल सेरीझ, खराडी १०४ टक्के , मार्वल ब्रिसा, बालेवाडी १०० टक्के , मार्व्हल कास्काडा, बालेवाडी ८० टक्के आणि मार्वल सेल्वा रिज इस्टेट, बावधनने ४५ टक्क्यांची नोंद केली आहे. पुण्यातील मार्वलच्या लक्झरी प्रॉपर्टीचे वर्षानुवर्षे होणारे मूल्य मापन एकूण प्रमाणाच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एकूणच, मार्वल प्रॉपर्टीज पुण्यातील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये आघाडीवर आहेत आणि गेल्या वर्षभरात त्याच परिसरातील इतर प्रीमियम प्रॉपर्टीजच्या तुलनेत -३ टक्के ते ८ टक्के वाढीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना ७ टक्के ते १२ टक्के वाढीचा फायदा होत आहे.

मार्वल रियल्टर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विश्वजीत झावर म्हणाले की, मार्वल हे मोठ्या आकाराच्या निवासस्थानांची रचना करण्यात अग्रेसर आहे आणि गेल्या दशकात, लक्झरी रिअल इस्टेट विभागातील प्रशस्त अपार्टमेंट्सची मागणी वाढली आहे. आमच्या २ बीएचके अपार्टमेंटचा आकार देखील १,४०० चौ. फूट पासून सुरू होतो, तर आमचे ३ बीएचके २,०००चौ. फूट आणि ४ बीएचके ५,००० ते ८,००० चौ. फुटांपर्यंतचे आहेत. आमचे प्रकल्प देखील एका अनोख्या इन साईड आऊट ३६०-अंश समग्र अनुभवाच्या दृष्टिकोनाने डिझाइन केलेले आ

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in