साथीच्या आजारांचा धोका वाढला! चार प्रमुख रुग्णालयांसह एकूण १६ उपनगरीय रुग्णालये सज्ज

मलेरिया, डेंग्यू, लेप्टोला रोखण्यासाठी ३ हजार बेड्स अॅक्टीव्ह
साथीच्या आजारांचा धोका वाढला! चार प्रमुख रुग्णालयांसह एकूण १६ उपनगरीय रुग्णालये सज्ज

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो हे साथीचे आजार पावसाळ्यात डोके वर काढतात. साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी चार प्रमुख रुग्णालयासह उपनगरीय १६ रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. या रुग्णालयात ३ हजार बेड्स अॅक्टीव्ह ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, एमओएच, एएमओ (सर्व्हेलन्स), सीडीओ आणि हेल्थ पोस्ट स्टाफ अशी विभाग स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत करण्यात आली आहेत.

कावीळ, विषमज्वर कॉलरा यांसारखे जलजन्य आजार, मलेरिया, डेंग्यू सारखे कीटकजन्य तसेच लेप्टोस्पायरोसिस, एच१एन१ हे संसर्गजन्य आजार पावसाळ्यात झपाट्याने पसरतात. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पावसाळाजन्य आजाराच्या नियंत्रण व उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला जातो. तसेच पालिकेच्या एफ साऊथ विभागात १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येईल, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ही रुग्यालये 'अलर्ट'

- ५ वैद्यकीय महाविद्यालये - केईएम, सायन, नायर, कूपर, जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स व विशेष रुग्णालय कस्तुरबा रुग्णालय

- १६ पेरिफेरल रुग्णालय, १९१ दवाखाने, २१२ हेल्थ पोस्ट, १५८ आपला दवाखाना (एच बी टी क्लिनिक)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in