राज्यात लम्पीग्रस्त प्राण्याची वाढती संख्या ; 'हा' प्रश्न उभा राहणार

लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली
राज्यात लम्पीग्रस्त प्राण्याची वाढती संख्या ; 'हा' प्रश्न उभा राहणार

महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य लम्पी त्वचारोगाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे लम्पी आजाराने ग्रस्त असून, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पशुधनांमधील लम्पीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. लसींचा तुटवडा असेल तर परदेशातून लस आयात करावी. लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in