नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दणदणीत विजय ; केले सूचक ट्विट

सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर एकूण 68 हजार 999 मते मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावे लागले
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दणदणीत विजय ; केले सूचक ट्विट

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा जवळपास ३० हजार मतांनी पराभव झाला आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून आणि उमेदवारी अर्ज भरल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे दणदणीत विजयाने नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.

सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर एकूण 68 हजार 999 मते मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावे लागले. पाटील यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी पराभव झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in