भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेनेत

भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेनेत

भंडारा : भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘आमदार भोंडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या वातावरण असून, पक्ष संघटन येणाऱ्या काळात मजबूत होईल’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत. २०१९ साली पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते.

‘नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासून शिवसैनिक होते. त्यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in