सांगलीत अपक्ष विशाल पाटील विजयी

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बराच वाद रंगला होता. संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटील या दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव करत विशाल पाटील यांनी विजय मिळवला.
सांगलीत अपक्ष विशाल पाटील विजयी

सांगली : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होती. या निकालात महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. तर महायुतीला मोठा फटका बसतानाची चिन्हे आहेत. त्यात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बराच वाद रंगला होता. याठिकाणी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना डावलून मविआने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती. विशाल पाटील यांना ५ लाख ५ हजार मते, संजयकाका पाटील यांना ४ लाख २० हजार मते तर मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ ५५ हजार मते पडली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव केला.

उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत येत घोषित केली. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले. त्याचेच रूपांतर विशाल पाटील यांच्या बंडखोरीत झाले. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीत भाजपविरोधात दंड थोपटले. त्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत. त्याठिकाणी भाजपाचे संजयकाका पाटील आणि मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in