
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी अखेरचा दिवस होता. विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी देशाच्या संविधानावर आपले मत व्यक्त केले. संविधानात मोठी ठेव लोकशाही आहे, जगातील संविधानांमध्ये भारताचे संविधान श्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. दरम्यान, राज्यात संविधान सभेचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ मध्ये झाले. त्यावेळी या अधिवेशनाची सुरुवात ‘वंदे मातरम’ गीताने झाली, असा उल्लेख फडणवीस यांनी यावेळी केला.
विधानसभा सदस्यांनी संविधानावर आपले मत व्यक्त केल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी संविधानाचे महत्त्व काय आहे, याबाबत आपले मत व्यक्त केले. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू झाले आणि बुधवारी २६ मार्चला अधिवेशनाची सांगता झाली.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मी संविधानाला व संविधान सभेला नमन करतो. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो. संविधानाने सामाजिक, आर्थिक व राजकीय क्रांती आणली. बाबासाहेबांमुळे रक्तविरहित क्रांती घडली. संविधान तयार करताना उच्च भारतीय मूल्यांचा विचार करून त्यावर आधारित संविधान बाबासाहेबांनी तयार केले आहे. १९४६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायक वळणावर पोहचली, तेव्हा इंग्रजांनी ‘कॅबिनेट मिशन’ पाठवले. त्या ‘कॅबिनेट मिशन’ने रिपोर्ट दिला की, भारताचे स्वतंत्र संविधान तयार करावे लागेल. त्यावेळी संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
१९३५ चा कायदा हा एक प्रकारे संविधान होते. पण ते इंग्रजी राज्य चालवण्यासाठी भारतीय लोकांचा सहभाग असावा यासाठी होते. ते आपण संविधानात परावर्तित केले नाही. संविधानाने एकेक ‘आर्टिकल’वर चर्चा केली आहे, मग स्वीकार केला आहे. १६५ दिवस ही चर्चा झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी पहिली चर्चा तर २४ जानेवारी १९५० रोजी शेवटची चर्चा झाली. तीन वर्षे हे काम सुरू होते. जगाच्या पाठीवर सर्वात प्रदीर्घ काम ज्या संविधान सभेने केले ती ही भारताची संविधान सभा होती. ३८९ सदस्य यामध्ये होते. ९ डिसेंबर १९४६ ला पहिले अधिवेशन झाले. तेव्हा त्याची सुरुवात ‘वंदे मातरम्’ गीताने झाली. आचार्य कृपलानी यांनी पहिले भाषण केले होते. एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुतांश ड्राफ्ट तयार केला. म्हणून संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोरेला मारले तेव्हा संविधान कुठे होते? केतकी चितळेला तुरुंगात डांबले तेव्हा संविधान कुठे होते? मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली, तेव्हा संविधान कुठे होते? हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडले तेव्हा संविधान कुठे होते? खोट्या केसेस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले तेव्हा कुठे होते संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होते संविधान? वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवले नाही का? नारायण राणेंना अटक करताना संविधान आठवले नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला तेव्हा कुठे होते संविधान?”
“जे आता सरकारवर संविधानाचा गळा घोटण्याचा आरोप करत आहेत, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. त्यांचे बरेच उद्योग आहेत. पण मी ते काढत नाहीत. ते बाहेर काढले तर त्यांना कोरे संविधान घेऊन पळ काढावा लागेल. आता हल्ली कुणीही येतो व संविधान दाखवतो,” असे शिंदेंनी सांगितले.
संविधानात मोदी सरकारने देशाला दिशा देणाऱ्या सुधारणा केल्या!
आता संविधानामध्ये बदल झाला आहे. मसुदा वेळी ७ हजारांहून अधिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्यातील २ हजार स्वीकारल्या गेल्या. त्यानंतर १०६ सुधारणा झाल्या. ओबीसी आयोगाला संविधान दर्जा, जीएसटीसाठी झालेली सुधारणा ही नुकतीच झालेली आहे. महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याची सुधारणा आहे. देशाला दिशा देणाऱ्या या सुधारणा मोदी सरकारच्या काळात झाल्या आहेत. राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले. पण समाज एक राहिला. त्यातील पारंपरिक भाव एक राहिला. त्यामुळे राजकीय व्यवस्था तयार करायची होती, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणारे संविधान तयार झाले. भारताची नीती काय, हे संविधानाची उद्देशिका सांगते”, असेही फडणवीस म्हणाले.