जेजुरीला भारतीय वेशभूषा सक्तीची; वस्त्रसंहिता लागू, देवस्थान ट्रस्टकडून नियमावलीही जाहीर

येथील जेजुरी गडावर देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोमवारपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
जेजुरीला भारतीय वेशभूषा सक्तीची; वस्त्रसंहिता लागू, देवस्थान ट्रस्टकडून नियमावलीही जाहीर
Published on

जेजुरी : येथील जेजुरी गडावर देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोमवारपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. विशेष म्हणजे ट्रस्टकडून त्याची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाश्चिमात्य कपडे परिधान करून भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, जेजुरी देवस्थानचा हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठी लागू असणार आहे.

पुरुष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान, दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे, असेही मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in