इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार? 'त्या' वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने कनिष्ठ न्यायालयात गुन्हा दाखल केला होता
इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार? 'त्या' वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आपल्या विनोदी शैलीतून सर्वांना खळखळू हसवणारे किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांचं बेताल वक्तव्य भोवलं आहे. इंदोरीकर यांनी आपल्या किर्तनातून लिंग भेदावर भाष्य केलं होतं. त्यांनी सम विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होते, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ
उडाली होती. यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने इंदोरीकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली. कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

औरंगाबाद कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी लिंगभेदाबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने कनिष्ठ न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा यासाठी इंदोरीकर महाराज यांनी सेशन कोर्टात धाव घेतली होती. यानंतर सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यामुळे हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं होतं. आज त्यावर सुनावणी झाली असता इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंदोरीकर महाराज हे विनोदी किर्तनकार असून ते आपल्या मिश्किल शैलित किर्तन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिर्डी येथे त्यांचं किर्तन सुरु असताना. त्यांनी लिंग भेदावर भाष्य केलं होतं. यावेळी ते सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असं ते म्हणाले होते. यांच्या या वादग्रस्त वक्यव्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराज यांना पीसीपीएडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यानंत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in