इंद्रजित सावंत धमकी प्रकरण : कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.
इंद्रजित सावंत धमकी प्रकरण : कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
Published on

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. त्यामुळे कोरटकरला आता पुढील काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे. कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला कळंबा येथील कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. दिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी हा निर्णय दिला. प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोरटकरच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी पार पडली. मात्र सरकारी वकिलाच्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

कोरटकर हा शिवभक्त होता, त्याच्या हातून गुन्हा घडायच्या आधी शिवजयंतीला त्याने रायगडला जाऊन महाराजांना अभिवादन केल्याचे पुरावे आहेत, असा युक्तिवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला. मात्र, या प्रकरणात तपास करण्यासारखे काहीच नसून प्रशांत कोरटकरला जामीन दिला तर तो पुन्हा पळून जाईल. आरोपीला समाजात तेढ निर्माण करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in