MSBTE चे औद्योगिक प्रशिक्षण ६ आठवड्यांवरून १२ आठवडे: आता निर्माण होईल सर्वोत्तम अभियंता

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० (National Education Policy-2020) च्या तरतूदींनुसार डिप्लोमा अभ्यासक्रमात सुधारणा केल्या आहेत.
MSBTE चे औद्योगिक प्रशिक्षण ६ आठवड्यांवरून १२ आठवडे: आता निर्माण होईल सर्वोत्तम अभियंता
(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० (National Education Policy-2020) च्या तरतूदींनुसार डिप्लोमा अभ्यासक्रमात सुधारणा केल्या आहेत. भारतातील शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिक्षण घेताना प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा किती उपयोग होतो हे महत्त्वाचे असते. विशेषत: जेव्हा तांत्रिक शिक्षण घेतले जाते तेव्हा ज्ञान आणि कौशल्या सोबतच औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व अधिक असते. अशा औद्योगिक प्रशिक्षणाचा हेतू अभियंत्याला प्रत्यक्ष उद्योगात काम करताना उपयोग व्हावा हा असतो. त्यामुळेच MSBTE च्या K Scheme अभ्यासक्रमात तंत्रशिक्षणाला थेट व्यावहारिक कौशल्याच्या विकासाची जोड दिली आहे.

MSBTE ने K Scheme च्या अभ्यासक्रमात योग्य औद्योगिक प्रशिक्षणावर भर दिला आहे. जेणेकरून अभियंता रोजगारक्षम होऊ शकेल. विद्यार्थ्यांना योग्य औद्योगिक प्रशिक्षण मिळावे यासाठी MSBTE ने याआधीच्या ६ आठवड्यांचा औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी १२ आठवडे केला आहे. काही पदविकांकरिता औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनुसार उपयुक्त असल्याच्या औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी १६ आठवडे किंवा २४ आठवडे देखील ठेवण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यंमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कौशल्ये रुजविले जातील. प्रादेशिक गरजा अभ्यासून त्यावरील तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या दृष्टीने अभ्याक्रमात तरतूद करण्यात आली आहे. ‘उन्नत महाराष्ट्र’ अभियानातील उद्देशानुसार राज्याच्या गरजा अभ्यासून त्यावरील तंत्रज्ञानावरील आधारित योजनांवर काम करता येईल याचा विचार अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता मिळण्याच्या दृष्टीने “Financial Literacy” या बाबींचा देखील अभ्यासक्रमात अंतर्भाव आहे. सध्याच्या डिजिटल युगाचा विचार करून MSBTE ने डिजिटल मीडियाचा प्रभावी उपयोग कसा करता येईल या दृष्टीने अभ्यासक्रमात बदल केला आहे.

MSBTE च्या K Scheme अभ्यासक्रमात विद्यार्थी स्वयं अध्ययनाद्वारे स्वत:ची क्षमता, प्रगती आणि विकास यांचे मुल्यांकन करू शकतात. यासाठी अभ्यासक्रमात Self Learning Assessment (SLA) चा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in