उद्योगमंत्री उदय सामंत लिलावतीमध्ये दाखल

उदय सामंत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत लिलावतीमध्ये दाखल

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री यांना प्रकृती अस्वास्थामुळे तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय सामंत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या उदय सामंत यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दावोसचा दौरा केला होता. या दौऱ्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in