फूड पॅकेटस, ब्लँकेट्ससह मदत साहित्याचा ओघ

मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले
फूड पॅकेटस, ब्लँकेट्ससह मदत साहित्याचा ओघ

इर्शाळवाडीतील दुर्घटनेत वाचलेल्या नागरीकांसाठी घटनास्थळी तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने पूर्तता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योगसंस्था पुढे आल्या आहेत. मदत साहित्य आणि निवाऱ्यासाठी दोन कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून रवाना झाले आहेत. चौक , खालापूर येथील तात्परती निवाराव्यवस्था केली जात आहे. मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच विद्युत पुरवठा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता, महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस पाण्याच्या बॉटल्स, ब्लँकेट्स, टॉर्च, मदतसाहित्य, चादरी, बिस्कीटे तसेच इतर प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार -एकनाथ शिंदे

बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्याला प्राधान्य दिले जात असून त्याचे नियोजन झाले आहे. बाधितांचे कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भातदेखील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“१६ लोकांचा मृत्यू झाला असून वाडीतील १०३ लोकांची ओळख पटविण्यात आली असून त्यापैकी ९० जण सुरक्षित आहेत. जखमींवर पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सतत पाऊस होत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. हेवी मशिनरी व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकली नाहीत,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in