Pune : चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने फेकली शाई

चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यात विरोधक आक्रमक
Pune : चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने फेकली शाई
Published on

पिंपरी-चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यात विरोधक आक्रमक झाले. आज सकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी निदर्शने करून पाटील यांचा निषेध केला.



दरम्यान, ते आज दुपारी एका कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवडला येणार होते. यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले होते. चिंचवड येथील भाजप पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चहा पानासाठी थांबले. चहापानानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. हा प्रकार होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले. 

logo
marathi.freepressjournal.in