तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी; पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी; पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी; पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

अहिल्यानगर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तुळजाभवानी देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी; पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
आता 'बद्रीनाथ'मध्येही चौकशीचे आदेश; देणग्यांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप, मंदिर समितीकडून स्वतःहून दखल

तुळजाभवानी मंदिराला ४ हजार ८२० एकर जमीन निजामाकडून देणगी म्हणून आली. सदर जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. असे असतानासुद्धा महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने खासगी व्यक्तींना तिचे वाटप करण्यात आले. देवस्थानच्या नावे ३ हजार ३९७ एकर जमीन असताना प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मात्र काही खासगी व्यक्तींच्या नावे देण्यात आला, असा आरोप आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in