मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करा ; आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांना यावेळी महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी यावेळी राज्यपालांना दिले
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करा ; आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात मोठया प्रमाणात घोटाळे झाले आहेत. सहा हजार कोटींचा रस्ता घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा,स्ट्रीट फर्निचर घोटाळा अशा घोटाळयांचीच मालिका आहे. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी. तसेच महापालिका आयुक्तांच्या कारभाराचीही चौकशी करावी अशी मागणी उदधव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेउन केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील आमदारही सोबत होते.

राज्यपाल रमेश बैस यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. राज्यपालांना यावेळी महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी यावेळी राज्यपालांना दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जानेवारी महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यांच्या कामाचे विविध घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्याची माहिती राज्यपालांना दिलीय. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत.बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे हे सरकार आहे .रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६००० कोटींचा रस्ता घोटाळा झालाय.१० रस्त्यांची काम देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. सगळ्यांनी तक्रारी केल्या.मात्र कारवाई नाही झालेली आहे.खडी घोटाळ्यात मुख्यमंत्री यांचे जवळचे कंत्राटदार आणि माणसं यात सामील आहेत.रस्ते फर्निचर १६० कोटींची काम २६३ कोटी रुपयांना दिली आहेत.

पुणे जिल्ह्यातील नद्या मारण्याचं काम. टेकडी सपाट करण्याचं काम सुरू आहे.राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले. कधी शेतात पळून जातात तर कधी गुवाहाटी कुठे निघून जातात.कॉन्ट्रॅक्टर ना ६६ टक्के फायदा पोहोचवला जातो आहे.या आरोपासह पुरावा राज्यपालांकडे निवेदनासह दिलाय. या भ्रष्टाचाराची लोकायुक्त मार्फत चौकशी व्हावी मुंबई महापालिका आयुक्तां ची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in