तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून १३ पुजाऱ्यांची नावे समोर आल्याने खळबळ माजली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग
सोशल मीडिया
Published on

तुळजापूर : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून १३ पुजाऱ्यांची नावे समोर आल्याने खळबळ माजली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपी असून यामधील २१ आरोपी फरार आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदेंनी ही माहिती दिली. तुळजापूर हे पुजाऱ्यांचे गाव आहे. इथे अनेक पुजारी आहेत. सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, असेही विपीन शिंदे यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. दरम्यान, ३ वर्षांपासून तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in