कॉम्रेड पानसरे हत्याकांडात सनातन संस्थेचा सहभाग; कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणात सनातन संसथेचा सहभाग असल्याचा दावा करताना आम्हाला अजून काही सांगायचे आहे. आमचा जबाब नोंदविला जावा, अशी विनंती पाानसरे कुटूंबीयांच्या वतीने करण्यात आली.
कॉम्रेड पानसरे हत्याकांडात सनातन संस्थेचा सहभाग; कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा
Published on

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणात सनातन संसथेचा सहभाग असल्याचा दावा करताना आम्हाला अजून काही सांगायचे आहे. आमचा जबाब नोंदविला जावा, अशी विनंती पाानसरे कुटूंबीयांच्या वतीने करण्यात आली. याची दखल घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठाने २५ जूनपूर्वी जबाब नोंदविण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी १२ जुलैपर्यंत तहकूब ठेवली.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. पानसरे यांच्यावर कोल्हापुरात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. कॉ. पानसरे, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र गेल्या सात वर्षांत प्रमुख आरोपीचा शोध न लागल्याने पानसरे यांच्या सून स्मिता पानसरे यांनी एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. त्यानुसार तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वर्ग करण्यात आला.

त्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पानसरे कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकडांत कनिष्ट न्यायालयाने पोलीस आणि एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त केल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून देताना या हत्यांकांडात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचा पूर्नउच्चार केला. तसे आम्हाला काही त्या संदर्भात सांगायचे असून, त्या आधारे तपास करावा, अशी विनंती केली. यावेळी तपास यंत्रणेच्यावतीने अ‍ॅड. अशोक मुदरगी यांनी पूर्वी तपास करणाऱ्या एसआयटीनेही या अँगलने तपास केल्याची कबुली दिली. अखेर खंपीठाने पानसरे कुटूंबीयांचा २५ जूनपूर्वी जबाब नोंदवून घेण्याचे आणि त्या दृष्टीने तपास करण्याचे निर्देष देत याचिकेची सुनावणी १२ जुलैपर्यंत तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in