IRCTC : दादर-मनमाड रेल्वेतील डब्यांत वाढ

या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू
IRCTC : दादर-मनमाड रेल्वेतील डब्यांत वाढ

मुंबई : दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेषला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. १८ मे आणि २० मे पासून हे डब्बे वाढवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०२१०१/०२१०२ आणि ट्रेन क्रमांक ०१०६५/०१०६६ साठी एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान, ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन सह ५ सामान्य द्वितीय श्रेणी अशी सुधारित संरचना करण्यात आली आहे. या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in