"उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद नव्हती, तर दसरा मेळाव्याचे भाषण होते"; विधानसभा अध्यक्षांनी आरोप फेटाळले

ज्या लोकांना संविधानिक संस्थांवर विश्वास नसेल तर त्यांचा संविधानावर कसा विश्वास असू शकतो असा प्रश्न पडतो, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.
"उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद नव्हती, तर दसरा मेळाव्याचे भाषण होते"; विधानसभा अध्यक्षांनी आरोप फेटाळले
Published on

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचे ठरवत मुंबईतील वरळी येथे महापत्रकार परिषेदे आयोजन केले होते. या परिषदेत त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर तारेशे ओढले. यावर आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद नव्हती, तर दसरा मेळाव्याचे भाषण होते, त्यांनी संविधानिक संस्थांबद्दल अपशब्द वापरले, मला वाटले माझे काही चुकले असेल तर ते सांगतील, पण तसे काही झालेच नाही", असे राहुल नार्वेकर म्हणाले. तसेच, खोट्यापेक्षा अर्धसत्य सांगणे हे धोकायदाक असल्याचे म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोपही फेटाळून लावले.

ज्या लोकांना संविधानिक संस्थांवर विश्वास नसेल तर त्यांचा संविधानावर कसा विश्वास असू शकतो, असा प्रश्न पडतो. निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. पण, लोकांमध्ये या संविधानिक पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीबद्दल गैरसमज पसरवला गेला तर ते योग्य नाही, म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचेही त्यांनी म्हटले.

मी जी कारवाई केली ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली आहे. त्यांनी सांगितल्यानंतरच राजकिय पक्ष, व्हीप आणि मग पुढील कारवाई केली. मूळ पक्ष कोणता हे तपासण्यासाठी मला तीन निकष ठरवण्यात आले होते. त्यात पक्षाची घटना, पक्षाची संरचना या बाबींचा सामावेश होता. अध्यक्षांनी 1999ची घटना योग्य ठरवली आणि 2018ची अयोग्य ठरवली असे सांगण्यात आले. मात्र, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की 2 गटांनी वेगवेगळ्या घटनेचा आधार घेऊन दावा केला तर त्यावेळी निवडणूक आयोगाकडे जी घटना आली असेल ती ग्राह्य ठरवावी, असे स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in