जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Published on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये सुद्धा नागरिकांना स्थलांतरित करावे लागले असून खेड शहरातील स्थलांतरितांची संख्या चिकुळात ४१, तळ्याचे वाकन परिसरात ८४ असे एकूण १२५ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तलाठी कोतवाल पोलीस पाटील व ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले असून संगमेश्वर तालुक्यातील कोंड, आंबेड, धामणी, कसबा, करजुर्वे, फणसवणे या गावात पाणी भरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

खेड शहरातील ९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून हे सर्व सम्राट नगर बाळवाडीतील नागरिक आहे. जगबुडी नदीचे पाणी वाढत असून बाजारपेठांमध्ये नागरी वस्तीमध्ये पाण्याची पातळी वाढतच आहे. सायंकाळी पाणी भरलेले असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in