'जय भवानी' शब्द हटवणार नाही, उद्धव ठाकरेंनी EC ची नोटीस धुडकावली; म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहा वर्षासाठी निवडणूक लवढण्यावर बंदी घातली होती...
'जय भवानी' शब्द हटवणार नाही, उद्धव ठाकरेंनी EC ची नोटीस धुडकावली; म्हणाले...

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस बाजवली आहे. या गाण्यातील 'हिंदू' आणि 'जय भवानी' हे दोन शब्दावर आक्षेप घेतला असून ते काढण्यास सांगितले आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज (२१ एप्रिल) पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून निशाणा साधला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली की जय बोलून बटण दाबा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर रामल्लाचे दर्शन मोफत घडवणार, ही वक्तव्य जाहीर सभेत केले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच पक्षाच्या प्रचार गीतामधून 'जय भवानी' शब्द काढणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या नोटीसबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, आमची निशाणी बदलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी आता मशाल आहे. निवडणुकीत प्रचारसाठी प्रचार गीत लागते. त्यासाठी आम्ही मशाल गीत हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवले होते. आमचे गीत निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र लिहिले की, आमच्या गाण्यातील दोन शब्द काढायला सांगितले आहे. या गाण्यातील 'हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर त्यास तू बहाल' या कडव्यातील 'हिंदू' शब्द हटवण्यास सांगितला आहे. परंतु, हिंदू शब्द काढणे योग्य आहे काय? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी आयोगाला केला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडल्याची टीका राज्यकर्ते करत आहेत. त्या राजकर्त्यांच्या हाताखाली निवडणूक आयोग काम करतो. आमच्या प्रचार गीतमध्ये हिंदू धर्माच्या नावाखाली मते मागितली नाही. पण, आम्ही हिंदुत्व सोडले, असे म्हणणारे आणि त्यांच्याकडेचा चाकर असलेल्या प्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जय भवानी शब्द काढणार नाही

निवडणूक आयोगाच्या नोटीसीला उद्धव ठाकरेंचे जोख प्रत्युत्तर देत म्हणाले, आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशिर्वाद दिला आहे. गेली कितेक वर्ष 'जय भवानी जय शिवाजी' अशी जय घोषणा करत आहोत. आम्ही हर हर महादेव' किंवा 'जय भवानी जय शिवाजी बोललो' तर तुमचा आक्षेप असता कामा नये. या गाण्याचा बॅगग्रांउडला 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा आहे. या गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढा असा लेखी फतवा आम्हाला आलेला आहे. परंतु, आम्ही आमच्या गाण्यातून 'जय भवानी' हा शब्द काढणार नाही. यानंतर निवडणूक आयोग आमच्यावर कारवाई करणार असेल तर त्यांनी मोदी आणि शहांवर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा तुम्ही अपमान केला आहात. या आरोपाला निवडणूक आयोगा काय उत्तर आहे? परंतु, राज्याच्या कुलदैवताबद्दल ऐवढा द्वेष त्यांच्या नसानसात ठासून भरला असेल यांची आम्हाला कल्पना नव्हती."

आज तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावत आहात. उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द तुम्ही काढायला लावाल. आम्ही हुकूमशाही पद्धत स्वीकारणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करण्यापूर्वी आयोगाने शहा-मोदींवर कारवाई करावी लागेल. नंतर महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान कसा करतात ते बघतो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

बाळासाहेबांवर सहा वर्षासाठी बंद

यावेळी उद्धव ठाकरेंनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहा वर्षासाठी निवडणूक लवढण्यावर बंदी घातली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी धार्मिक प्रचार केल्याप्रकरणी आयोगाने कारवाई केल्याची आठवणही उद्धव ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in