जयगड बंदरातील जहाजातून LPG गॅसचा तातडीने उपसा करा; उच्च न्यायालयाचे सरकारी यंत्रणांना आदेश

जयगड बंदरात उभ्या असलेल्या जहाजातून 'एलपीजी गॅसचा तातडीने उपसा करा, आदेश उच्च न्यायालयाने संबंधित सरकारी यंत्रणांना दिले. गॅस गळतीमुळे होणारा संभाव्य स्फोट, आग आणि मोठा अनर्थ टाळण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला.
जयगड बंदरातील जहाजातून LPG गॅसचा तातडीने उपसा करा; उच्च न्यायालयाचे सरकारी यंत्रणांना आदेश
जयगड बंदरातील जहाजातून LPG गॅसचा तातडीने उपसा करा; उच्च न्यायालयाचे सरकारी यंत्रणांना आदेश'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : जयगड बंदरात उभ्या असलेल्या जहाजातून 'एलपीजी गॅसचा तातडीने उपसा करा, आदेश उच्च न्यायालयाने संबंधित सरकारी यंत्रणांना दिले. गॅस गळतीमुळे होणारा संभाव्य स्फोट, आग आणि मोठा अनर्थ टाळण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला.

'एलपीजी आमीर गॅस' या जहाजाबाबत जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकलपीठाने सुनावणी घेऊन संबंधितांना कार्यवाहीचे आदेश दिले. २९ एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या जहाजाला जप्त केले होते, पण घालण्यात आली होती.

मात्र, सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन नंतर बंदी उठवण्यात आली. जहाजातील गॅसचा स्फोट झाल्यास कर्मचारी, बंदराचे अतोनात नुकसान आणि आजूबाजूच्या पर्यावरणाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in