जळगावहून चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; भक्तिमय वातावरणात निरोप समारंभ

आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुमारे चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी शनिवारी रवाना झाले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा निरोप समारंभ भक्तिमय वातावरणात पार पडला.
जळगावहून चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; भक्तिमय वातावरणात निरोप समारंभ
जळगावहून चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; भक्तिमय वातावरणात निरोप समारंभPM
Published on

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुमारे चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी शनिवारी रवाना झाले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा निरोप समारंभ भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकरी बंधू-भगिनींना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे. या सेवेसाठी विठ्ठलाने मला केवळ निमित्त बनविले, हेच माझे खरे भाग्य आहे.

जळगाव येथील जी.एस. ग्राऊंड येथे दुपारपासून जमलेल्या हजारो नोंदणीकृत वारकऱ्यांना ओळखपत्रे, प्रवास पास, आवश्यक साहित्य तसेच संपूर्ण प्रवासाचे नियोजन याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर जी.एस. ग्राऊंडवरून नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या भव्य पालखी-दिंडीने संपूर्ण शहर भक्तिमय झाले.

टाळ, मृदंग, वीणा, अभंग, फुगड्या, रिंगण, हरिनामाचा अखंड गजर आणि भगव्या पताकांनी जळगाव शहर दुमदुमून गेले. रेल्वे स्थानकावर त्यांनी विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन वारकऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या प्रवासाच्या सोयी-सुविधांची पाहणी केली. नोंदणी, आसनव्यवस्था, डॉक्टरांचे पथक, प्रथमोपचार पेट्या, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता, भोजन, स्वयंसेवक, पंढरपूरमधील निवास, महाप्रसाद, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन तसेच परतीच्या प्रवासाचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले.

महाप्रसादाची विशेष व्यवस्था

विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात दोन स्वयंसेवक, वैद्यकीय मदत, आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक, टाळकरी, वारकरी तसेच मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित होत्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in