कुंभमेळ्यासाठी जळगाव विमानतळाचा विस्तार; २५०० मीटरपर्यंतच्या धावपट्टीसाठी ३० कोटी

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जळगाव विमानतळाचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करून सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधा यांचा आढावा घेतला.
(Photo - X/@aaijlgairport)
(Photo - X/@aaijlgairport)
Published on

जळगाव : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जळगाव विमानतळाचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करून सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधा यांचा आढावा घेतला. त्यांनी विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी यांच्यासोबत विस्तारीकरणाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली.

विमानतळ संचालक त्रिपाठी यांनी महापालिकेकडून पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची, बाहेरील रस्त्यांवरील अपुरा प्रकाश आणि विजेचे खांब दुरुस्त करण्याची तसेच धावपट्टी विस्ताराची गरज अधोरेखित केली. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी घुगे यांनी विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे वाहतूक व्यवस्था, महामार्ग स्थिती, नाशिकसाठी वाहतुकीचे नियोजन आणि विमानतळ सुविधांचा विस्तार याबाबत चर्चा झाली.

विमानतळ टर्मिनल विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दोन मोठी व एक लहान विमानांची व्यवस्था होणार आहे. सध्या १,७५० मीटर धावपट्टी असून ती २,५०० मीटरपर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

जळगावहून सध्या पुणे, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि गोवा या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. इंडिगो कंपनीने सेवा सुरू केल्यास दिल्ली, सूरत, इंदूर आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांनाही थेट जोडणी मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in