Jalgaon : अल्पवयीन मुलाची आत्महत्या

चोपडा तालुक्यातील घुमावल येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ न दिल्याने सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
Jalgaon : अल्पवयीन मुलाची आत्महत्या
Jalgaon : अल्पवयीन मुलाची आत्महत्याप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

जळगाव : चोपडा तालुक्यातील घुमावल येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ न दिल्याने सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. जयेश संदीप पाटील असे मृत मुलाचे नाव आहे.

घुमावल येथे रविवारी गणेश विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. जयेशने मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पालकांकडे हट्ट धरला होता. मात्र, गावातील मिरवणुकीत न जाता आपल्या परिसरातून मिरवणूक गेल्यानंतर सहभागी व्हावे आणि तोपर्यंत अभ्यास करावा, असे पालकांनी त्याला सांगितले. यामुळे जयेश नाराज झाल्याचे सांगण्यात येते.

घरातील इतर मुले अभ्यासाला बसली असताना जयेश घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. त्यावेळी तो तिसऱ्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in