जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवार, २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी
जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणीX
Published on: 

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवार, २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १२ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित नऊ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील ३० मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी दिली.

या निवडणुकीत मुक्ताईनगर आणि चाळीसगाव मतदारसंघांकडे विशेष लक्ष लागले आहे. मुक्ताईनगरमधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात देवयानी देशमुख आहेत. तर चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात नारायण नथ्थू पाटील आणि विजय भिकनराव पाटील मैदानात आहेत.

मतदारांनी मतदानासाठी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)