Jalgaon : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मका पिकाकडे धाव; इथेनॉल तयार करण्याच्या उद्योगांसाठी मोठी संधी

जळगाव जिल्ह्यात साखर कारखाने बंद पडल्याने ऊसाऐवजी शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाकडे वळले आहेत. गेल्या वर्षी ८४ हजार हेक्टरमध्ये झालेल्या मकापेक्षा यंदा तब्बल २१०% वाढीसह १ लाख ९४ हजार ५०० हेक्टरमध्ये मका पेरणी झाली असून जामनेर, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, बोदवड, रावेर व यावल ही प्रमुख उत्पादन क्षेत्रे ठरली आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

जळगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने बंद पडल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आता मका पिकाकडे वळले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरमध्ये मका पेर झाला होता, तर यंदा १ लाख ९४ हजार ५०० हेक्टरमध्ये मका पेर झाला आहे, म्हणजे २१०% वाढ झाली आहे. जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, बोदवड, रावेर व यावल हे मुख्य मका उत्पादक झाल्याचे चित्र पहावयस मिळत आहे.

मक्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या उद्योगांसाठी जिल्ह्याला मोठी संधी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल असणे बंधनकारक केले इथेनॉलची मागणी वाढली आहे. मात्र सध्या जळगाव जिल्ह्यात इथेनॉलचा कोणताही प्रकल्प नाही, त्यामुळे स्थानिक उत्पादनावर आधारित प्रकल्प उभारल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो आणि जिल्ह्यात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

जिल्हा प्रशासनाने मक्यापासून इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी आराखडा तयार केला असून, काही उद्योजकांशी चर्चा सुरू आहेत. याबाबत जळगाव एमआयडीसीला डी झोन दर्जा मिळणार असून, विविध सबसीडींचा लाभही उपलब्ध होऊ शकतो.

स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी मका पिकाला प्राधान्य दिल्यामुळे इथेनॉल प्रकल्पासाठी आवश्यक कच्चा माल आता उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा आर्थिक विकास आणि शेतकऱ्यांसाठी स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाची ही पुढाकारात्मक भूमिका स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यास आणि जिल्ह्यातील आर्थिक संधी वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

logo
marathi.freepressjournal.in