जळगाव : गरबा खेळणाऱ्या महिलांवर हेडलाईट चमकवल्याच्या वादातून हत्या

गरबा खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाईट चमकवल्याच्या वादातून चॉपरने वार करून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील माउली नगरात मंगळवारी रात्री घडली.
जळगाव : गरबा खेळणाऱ्या महिलांवर हेडलाईट चमकवल्याच्या वादातून हत्या
जळगाव : गरबा खेळणाऱ्या महिलांवर हेडलाईट चमकवल्याच्या वादातून हत्या
Published on: 

जळगाव : गरबा खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाईट चमकवल्याच्या वादातून चॉपरने वार करून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील माउली नगरात मंगळवारी रात्री घडली. किरण विठ्ठल पाटील असे मृताचे नाव असून, किशोर छगन पाटील हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माउली नगरात दुर्गा मंडळाच्या वतीने गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी रात्री गरबा सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी महिलांवर हेडलाईट चमकवल्याने वादाला सुरुवात झाली. याबाबत विचारणा केल्यानंतर वाद वाढला. किरण पाटील आणि किशोर पाटील यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका संशयिताने चॉपरने किरण पाटील यांच्या छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या किरण यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील जखमी झाले.

या घटनेत मयूर जाधव, रोहित पाटील आणि अन्य एका तरुणाचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in