Jalgaon : हतनूर धरणावरील भूकंपमापन यंत्र सहा वर्षांपासून बंद! जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; नोंदींसाठी नाशिकच्या मेरी संस्थेचा आधार

तापी नदीवरील हतनूर धरणावर बसविण्यात आलेले भूकंपमापन यंत्र गेल्या सहा वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित यंत्र बंद असल्याची माहिती जलसंपदा विभागाला असूनही बदलण्यासाठी अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
Jalgaon : हतनूर धरणावरील भूकंपमापन यंत्र सहा वर्षांपासून बंद! जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; नोंदींसाठी नाशिकच्या मेरी संस्थेचा आधार
Jalgaon : हतनूर धरणावरील भूकंपमापन यंत्र सहा वर्षांपासून बंद! जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; नोंदींसाठी नाशिकच्या मेरी संस्थेचा आधारसंग्रहित छायाचित्र
Published on: 

जळगाव : तापी नदीवरील हतनूर धरणावर बसविण्यात आलेले भूकंपमापन यंत्र गेल्या सहा वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित यंत्र बंद असल्याची माहिती जलसंपदा विभागाला असूनही बदलण्यासाठी अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, जळगाव जिल्ह्यात किंवा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, तर त्याची अधिकृत नोंद हतनूर धरणावर होऊ शकत नाही. अशा वेळी जिल्हा प्रशासनाला नाशिक येथील मेरी (महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था) संस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे.

तापी नदीवरील हतनूर धरणावर परिसरातील भूकंपाच्या हालचालींची नोंद घेण्यासाठी भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले होते. या यंत्रामुळे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्यास त्याची तत्काळ नोंद उपलब्ध होणे अपेक्षित आहे. यापूर्वी या यंत्राचा उपयोगही करण्यात आला

आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून हे यंत्र बंद अवस्थेत आहे. ते बदलणे आवश्यक असतानाही हतनूर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, हतनूर ते धरणावरील भूकंपमापन यंत्र कार्यान्वित असते, तर प्राथमिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नाशिकच्या संस्थेवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती. स्थानिक पातळीवरच भूकंपाच्या हालचालींची नोंद उपलब्ध झाली असती.

हतनूर धरणावरील भूकंपमापन यंत्र बंद असल्याची माहिती जलसंपदा विभागाला यापूर्वीच देण्यात आल्याचे सांगण्यात येते. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ते बदलण्यासाठी कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले यंत्र इतकी वर्षे बंद राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

Jalgaon : हतनूर धरणावरील भूकंपमापन यंत्र सहा वर्षांपासून बंद! जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; नोंदींसाठी नाशिकच्या मेरी संस्थेचा आधार
Jalgaon Earthquake : जळगावमध्ये भूकंपाचा धक्का! रावेर, भुसावळसह अनेक तालुके हादरले; हतनूर धरण परिसरातही हादरा

भूकंपाच्या अफवेने प्रशासनाची धावपळ

१२ मार्च रोजी चाळीसगाव-पाचोरा परिसरात सायंकाळच्या सुमारास जमिनीतून दोन वेळा गूढ आवाज आल्याची घटना घडली होती. त्यानंतर परिसरात भूकंप झाल्याची अफवा पसरली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक जण घराबाहेर पडले. या घटनेची प्रशासनानेही तातडीने दखल घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधून संबंधित परिसरात भूकंपाची नोंद झाली आहे का, याची माहिती घेतली. मात्र, तेथे भूकंपाची नोंद नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भूकंप झालेला नसल्याचे सांगत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)