Jalgaon : विदेशी दारू, बिअर विक्रीत वाढ ; देशी दारू विक्रीत घट

दारू विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात ३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
Jalgaon : विदेशी दारू, बिअर विक्रीत वाढ ; देशी दारू विक्रीत घट
Hp

जळगाव जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यात ३१ लाख ८३ हजार ५४२ लिटर विदेशी दारू विक्री झाली, तर ३६ लाख ६२ हजार ३२५ लिटर बिअर रिचवली गेली. ४९ लाख ७४ हजार २३ लिटर देशी दारूचा तळीरामांनी आस्वाद घेतला. मागील वर्षाच्या तुलनेत विदेशी दारू विक्रीत १४ टक्के, बिअर १३ टक्के व वाईन विक्रीत १६ टक्के वाढ झाली असून, देशी दारू विक्रीत २ टक्के घट झाली आहे. या दारू विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात ३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, या सहा महिन्यात ५ कोटी ४७ लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ५० लाख ५० हजार २४६ लिटर देशी दारू विक्री झाली होती, तर यंदा एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सहामाहीत ही विक्री ७६२२३ लिटरने घटून ४९ लाख ७४ हजार २३ लीटर देशी दारू विक्री झाली. ही घट २ टक्के आहे. विदेशी दारू बाबत २०२२ मध्ये याच कालावधीत २७ लाख ९१ हजार १८३ लिटर विदेशी दारू विक्री झाली होती. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सहामाहीत तर ३ लाख ९२ हजार ३५९ ने वाढून ३१ लाख ८३ हजार ५४२ लीटर विदेशी दारू विक्री झाली आहे, ही वाढ १४ टक्के आहे.

शासनाला सहामाहीत ५ कोटी ४७ लाखांचे उत्पन्न

जळगाव जिल्ह्यात एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या मागील वर्षाच्या सहामाही दारू विक्री व महसूलाच्या तुलनेत एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्याच्या विदेशी, बिअर व कालावधीत दारू विक्रीत वाढ झाली दिसत असून, देशी दारू विक्रीत २ टक्के घट झाली आहे. महसूलात ३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दारू विक्रीतून शासनाला या सहामाहीत ५ कोटी ४७ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत यावर्षीच्या सहामाहीत महसूलात १ कोटी ३८ लाखांची वाढ झाली आहे.

४५ हजार ९३६ लिटर वाईनची विक्री

२०२२ यावर्षी याच कालावधीत ३२ लाख ३७ हजार ८८९ लिटर बिअर दारू रिचवली गेली होती. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सहामाहीत ४ लाख २४ हजार४३६ लिटरने वाढ होउुन ३६ लाख ६२ हजार ३२५ लीटर बिअर ची तडाखेबंद विक्री झाली आहे. विशेष म्हणजे सौम्य बिअरपेक्षा तीव्र बिअरला अधिक पसंती असल्याचे विक्रीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. बिअर विक्रीतही १३ टक्के वाढ आहे. २०२२ यावर्षी याच कालावधीत ४५ हजार ९३६ लिटर वाईनची विक्री झाली होती. तर एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सहामाहीत ५६ हजार ३५९ लीटर वाईनची विक्री झाली असून, ही वाढ १६ टक्के आहे. विशेष म्हणजे, अन्य महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्व दारू विक्रीत तडाखेबंद वाढ दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in