
जळगाव : जळगाव जिल्हयाला रविवारी रात्री आणि आज पावसाने झोडपून काढल्याने नदीनाले दुथडी भरून वाहात आहेत विदर्भातील पावसाने पूर्णा नदीला पूर आला आहे, त्यामुळे तापीला पूर आला असून हतनूर धरणातून ६४७३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणमतः तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी विविध तालुक्यांच्या दौ-यावर आहेत.
रविवारी रात्री जिल्हयात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाउस झाला यामुळे जिल्हयातील नाले दुथडी भरून वाहत आहेत.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा वनांद्री गावाततील पारधी वस्त्यात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात सुरक्षितपणे हलवण्यात तालुक्यातील अभाडा धरण भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साठले तर याच तालुक्यातील नागझिरी, कातखेडा येथील नाल्यांना पूर आला नागझिरी नाल्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीला बांधलेल्या आठ शेळया दगावल्या बोदवड तालुक्यात झाड घरावर कोसळल्याने घरातील व्यक्ती जखमी झाल्याअसल्याचे सांगण्यात आले जळगाव, प्रशासनाकडून आले रावेर धरणगाव, पाचोरा, तालुक्यात पिकांची हानी झाली आहे.