२०२४ मध्ये जळगावकरांनी रिचवली एक कोटी लिटर देशी दारू; बियर-विदेशी दारूचीही जबरदस्त विक्री

जळगाव जिल्हयात २०२४ मध्ये एक कोटी ३ लाख ३७ हजार लिटर देशी दारू , ७१ लाख ६७ हजार लिटर विदेशी तर ६५ लाख ८६ हजार लिटर बियरची तडाखेबंद विक्री झाली आहे.
२०२४ मध्ये जळगावकरांनी रिचवली एक कोटी लिटर देशी दारू; बियर-विदेशी दारूचीही जबरदस्त विक्री
Published on

विजय पाठक/जळगाव

जळगाव जिल्हयात २०२४ मध्ये एक कोटी ३ लाख ३७ हजार लिटर देशी दारू , ७१ लाख ६७ हजार लिटर विदेशी तर ६५ लाख ८६ हजार लिटर बियरची तडाखेबंद विक्री झाली असून २१३८ गुन्हे नोंदवले गेलेअसून या कारवाईत ५.३ कोटी रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगावचे अधिक्षक डॉ . व्ही.टी. भुकन यांनी आज नवशक्तीशी बोलतांना सांगितले.

२०२४ हे वर्ष राज्यात निवडणुक वर्ष होते. हे वर्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाला चांगलेच पावलेले आकडेवारीवरून दिसून येते.२०२३ मध्ये जिल्हयात ९४ लाख ९० हजार ५७९ लिटर देशी दारूची विक्री झाली .तर २०२४ मध्ये १ कोटी ३ लाख ३७ हजार ९५७ लिटर विक्री झाली असून ही ८ लाख ४७ हजार ३७८ लि.ने जास्त आहे . ही वार्षिक वाढ ९ टक्के असली तरी ऑक्टोबर मध्ये १९ टकके तर नोव्हेंबर मध्ये १२ , आणि डिसेंबरमध्ये १५ अशी घसघशीत वाढ दिसून येते.

विदेशी दारू विक्री बाबत देखील २०२३ मध्ये ६४ लाख १४ हजार ८७६ लिटर विदेशी दारूची विक्री झाली असून २०१४ मध्ये ७१ लाख ६७ हजार ५९३ लिटरची दमदार विक्री झालेली असून ७ लाख ५२ हजार ७१७ लिटरने विक्रीत वाढ झाली आहे . वर्ष भरात १२ टकके वाढ झालेली असली तरी सप्टेंबरमध्ये १८ , ऑक्टोबरमध्ये १४ , नोव्हेंबर मध्ये ११ तर डिसेंबर मध्ये २० टकके विक्रीत वाढ झालेली आहे .

२०२३ मध्ये जिल्हयात ६० लाख ३४ हजार २१४ लिटर बियरची विक्री झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in