'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य

जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांच्याबाबत व्हायरल होत असलेल्या पोस्टबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य
Published on

जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांना शून्य मतदान झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'सुनंदा यांचं स्वतःचं मत कुठे गेलं?' असा सवाल विचारत EVM मशीनवर शंका उपस्थित करणारी ही पोस्ट आहे. तथापि, व्हायरल होत असलेल्या पोस्टबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आधी बघा व्हायरल पोस्ट

काय आहे सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टसोबत उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात सुनंदा भागवत फेगडे यांच्या नावासमोर शून्य मते लिहिलेली स्पष्ट दिसतात. याद्वारे, 'सुनंदा यांचं स्वतःचं मत कुठे गेलं?' असा सवाल विचारला जात होता आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पोस्ट करण्यात आली होती. मात्र, व्हायरल पोस्टसोबत जोडलेली आकडेवारी ही पोस्टल मतांची असल्याचं समोर आलंय. म्हणजे सुनंदा फेगडे यांना पोस्टल मतदान शून्य झालं होतं. तर, ईव्हीएम मतदानात सुनंदा फेगडे यांना ९२ मते मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in