

मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर बुधवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमीन मजीद खान (२५), मलिक नजीर शेख (२१) आणि इम्रान अन्वर खान (३७) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरूड परिसरात आले होते. व्यवसायाच्या कामातून वेळ मिळाल्यानंतर ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले होते.
यावेळी अमीन खान आणि मलिक शेख हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि भरतीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात वाहून गेले. ही बाब लक्षात येताच तेथील लाइफगार्ड आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.