Jalna Dhangar Reservation Protest: जालन्यातील धनगर मोर्चला हिसंक वळण; संतप्त आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे होते. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आले नाहीत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले.
Jalna Dhangar Reservation Protest: जालन्यातील धनगर मोर्चला हिसंक वळण; संतप्त आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. अशात आता धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने जालन्यात मोर्चा काढण्यात आला होता. जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली आहे.

या मोर्च्यादरम्यान आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे होते. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आले नाहीत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. यावेली आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गेटवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तसंच कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर तुफान दगडफेक करण्यात आली. यामुळे या परिसरात सध्या तनावाच वातावरण आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्या आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात दोन समाज एकमेकांसमोर उभा ठाकल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणीसाठी जरांगे हे आंदोलन करत आहेत. यासाठी मराठा समाजाचा पाठींबा मिळावा म्हणून ते राज्यभर दौरे करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करु नका, अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी देखील एल्गार पुकारला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात साखळी उपोषण सुरु आहेत. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली होती. या दरम्यान, राज्यात बीड येथे मराठा आरक्षणाला हिंसक वळण देखील लागलं होत. यात आमदार प्रकाश सोळुंके यांचा बंगला दैखील जाळण्यात आला होता. त्यानंतर आता जालन्यात हिंसाचार उसळला आहे.

logo
marathi.freepressjournal.in