Jalna lathicharge : देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायची गरज नव्हती - अजित पवार

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Jalna lathicharge : देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायची गरज नव्हती - अजित पवार

आज जळगाव(Jalgaon) येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) हे जळगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संभोधित करताना मराठा आरक्षणाबाबत(Maratha Reservation) वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी जालन्यातील आंतरवली सराटी(Antarvali Sarati) गावात झालेल्या लाठीचार्ज(Lathi charge) प्रकरणी माफी मागायची काही गरज नव्हती, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. यावेळी पोलिसांकडून या उपोषणकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला होता. यानंतर राज्याचं वातावरण चांगलचं तापलं होतं. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने जाजोगारी रास्ता रोको, बंद, आंदोलन सुरु केलं होतं. यानंतर सरकारला समोर येऊन या घटनेवर भाष्ट करावं लागलं होतं.

यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारच्या वतीने क्षणा मागतो, जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला, असं फडणवीस याआधी म्हणाले होते. त्यानंतर राज्याचं वातारवण प्रचंड तापलं होतं. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी लागली होती.

अजित पवार यांनी याचं संबंधित बाष्य करत देवेंद्र फडणवीसांनी माफी मागण्याची काही आवश्यकता नव्हीत. आंतरवाली सराटी गावातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ती चूकच होती. तो निर्णय पोलिसांनी घेत लाठीचार्ज केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला नको होती, असं ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in